पुण्याजवळ विचित्र अपघात, दोन महिलांचा जागीच मृत्यू
अपघाताचा हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणार्यान नवले पुलावर आज संध्याकाळच्या पाचच्या सुमारास सातारा कडून मुंबईच्या दिेशेने निघालेल्या एका कंटेनरने एका पिकअप टेम्पोला कंटेनरने धडक दिली. यानंतर पिकअप टेम्पो शेजारून जाणार्यान दोन बुलेट आणि एक्टिवा गाड्यांना पाठीमागून धडकली. या विचित्र अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर एकीचा उपचारदरम्यान मृत्यू झाल आहे.
या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.