ब्रिटीश खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू
ब्रिटनमधले कन्झर्व्हेटिव्ह खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यांच्या मतदार संघात लोकांच्या गाठीभेटी घेत असताना हा हल्ला करण्यात आला होता.
एसेक्समधल्या ली-ऑन-सी भागामध्ये ब्रिटीश वेळेनुसार दुपारी 12 वाजता ही घटना घडली. यामध्ये संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आलेली असून पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त केलाय. 69 वर्षांचे सर डेव्हिड एमेस हे 1983 पासून खासदार होते. त्यांना 5 मुलं आहेत.
ली - ऑन - सी भागातल्या बेलफेअर्स मेथॉडिस्ट चर्चमध्ये एमेस यांची सभा सुरू होती. हा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्यावर चाकू हल्ला झाला.