Road Accident : ट्रक आणि केमिकल टँकरची जोरदार धडक दोघांचा मृत्यू
नाशिकजवळ अपघात मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या धुळ्याच्या दिशेने जात असलेल्या एका मोठ्या टॅंकरला ट्रकने मागून धडक दिल्याने टँकर पलटी होऊन आग लागली आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोघे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या केमिकल च्या टँकर मध्ये ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे वाहुतक व्यवस्था विस्कळीत झाली होती. अपघातापासून काहीच अंतरावर वाहतूक थांबविण्यात आली होती. या वाहनांची धडक जोरदार होती त्यामुळे केमिकल टँकर पलटी झाला आणि टँकरला आग लागली.