रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (09:09 IST)

चक्क कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड

नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते. केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागानं केलेल्या या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सलग एकाच ठिकाणी नाशिकमधील 4 ते 5 आणि पिंपळगावच्या 8 ते 10 व्यापाऱ्यांकडे एकाच वेळी छापासत्र सुरु केलं होतं.

दरम्यान आयकर विभागाच्या पथकानं जप्त केलेली रोख रक्कम मोजण्यासाठी पथकाच्या अनेक अधिकारी- कर्मचाऱ्यांना नाशिक आणि पिंपळगावमधील काही बँकांमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता रक्कम मोजण्यास सुरुवात केली.

तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत ही रक्कम मोजून पूर्ण झाली. म्हणजे जवळपास 18 ते 19 तास रोकड मोजण्यास लागले. 26 कोटींच्या रकमेत 500, 100 आणि 200 च्या नोटा सर्वाधिक होत्या.