शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (13:22 IST)

Solapur Road Accident News: कोंबड्यानी भरलेला आयशर टेम्पोचा अपघात झाला, लोकांनी कोंबड्या पळवल्या

Solapur Road Accident News: Eicher Tempo full of hens crashes
सोलापूर पुणे महामार्गावर सकाळी कोंबड्या घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोचा अपघात झाला. लोकांनी कुठल्याही प्रकाराची मदत न करता चक्क कोंबड्याचं पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. या वरून लोकांची मानसिकता दिसून येते. काही लोकांनी कोंबड्या घेऊन जाण्यासाठी वेगळे टेम्पो आणले आहे. सकाळी पुण्यावरून मराठवाड्याच्या दिशेने कोंबड्या घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा अपघात होऊन टेम्पो पलटी झाला आणि लोकांनी अपघातग्रस्ताला मदत करण्या ऐवजी चक्क टेम्पोतील कोंबड्याचं पळवून नेल्या. काहींनी 10 -15 कोंबड्या पळवू नेल्या तर काहींनी कोंबड्या नेण्यासाठी वेगळाच टेम्पो आणला. लोकांनी कोंबड्या नेण्यासाठी जमावडा केला आहे. घडलेल्या प्रकारामुळे लोकांची मानसिकता दिसून येते. घटनास्थळी पोलीस पोहोचली नसल्यामुळे गोंधळ सुरु होता. काही लोकांनी तर या अपघातात मृत झालेल्या कोंबड्या देखील पळवून नेल्याची माहिती मिळत आहे.