शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (10:01 IST)

देशात फक्त 23 कोटी लशी दिल्या हे पुराव्यानिशी सिद्ध करू - संजय राऊत

देशात केंद्र सरकार देत असलेला 100 कोटी लसीकरणाचा आकडा खोटा असून फक्त 23 कोटी लस दिल्या गेल्या आहेत, आपण ही गोष्ट पुराव्याने सिद्ध करु, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
नाशिक दौऱ्यावर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते. "लडाखची सीमा पार करून चीनचे सैन्य भारतात आले, काश्मीरमध्ये शीख हत्याकांड झाले आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरा केले जातात," अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
 
'राज्यातील भाजपचे सरकार घालवले आता दिल्लीला कूच करायची. देशात महाविकास आघाडी म्हणून नाही तर शिवसेना म्हणून जाणार,' असंही राऊत म्हणाले.