1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (10:26 IST)

चार मुलांना विष देऊन माजी सैनिकाची आत्महत्या

Ex-soldier commits suicide by poisoning four children
एका माजी सैनिक पित्याने चार मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बोरगल गावात ही धक्कादायक घटना घडली ज्यात वडिल गोपाल हादिमानी (वय 46) यांनी सौम्या (वय 19), स्वाती (वय 16), साक्षी (वय 12) आणि श्रीजन (वय 10) या चार मुलांना विष देऊन स्वत: आत्महत्या केली. गोपाल हादिमानी हे माजी सैनिक होते. 
 
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील बोरगल येथील गोपाल हादिमानी यांच्या पत्नी जया हादिमानी यांचे ब्लॅक फंगसमुळे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब नैराश्यात आलं होतं. पत्नीच्या मृत्यूनंतर अत्यंत नैराश्येतून पतीने आपल्या चारही मुलांना विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
 
दरम्यान, एकाच घरातील पाच जणांच्या मृत्यूमुळे बेळगावसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.