1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. dhananjay mundey winner

परळी कृ. उ. बा. समिती निवडणूक : पुन्हा एकदा धनजंय मुंडे विजयी

dhananjay mundey winner

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली आहे. तर  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत दोन्ही बहिण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा जिंकल्या तर, भाजपाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. 

 या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. या निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड दाखवून दिली आहे. नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता बाजार समितीमध्येही धनजंय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर मात केली आहे. 
पुढील लेख
लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर