बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (20:03 IST)

धुळे: जैतपूर येथे 12 मोरांचा मृत्यू

शिरपूर ताळुक्यातील जैतपूर परिसरातील विषयुक्त अन्न खाल्यामुळे 12 मोर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर एका मोराची प्रकृती खराब असल्याने शिरपूर तालुक्यात पह्लियांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ करीत पशुवैद्यकीय अधिकार्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर या मोरांच्या मृत्यूने वन विभागात खळबळ व्यक्त करण्यात आली आहे. 
 
शिरपूर तालुक्यातील जैतपूर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. तसेच बारमाही पिके जास्त प्रमाणात जास्त असल्याने अन्न व पाणी मुबलक असल्याने या परिसरात अनेक मोर वास्तव्यात आहेत. सध्या खरीपाचा हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. बियाणे किंवा रोपाला पेरण्या किंवा लावण्याअगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते. तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त केला आहे.