1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (12:16 IST)

मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास

NCP chief Jayant Patil
यवतमाळ - राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात दिवसभर पक्षाचा आढावा... सभा, बैठका आणि पुन्हा प्रवासात पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा दिनक्रम असताना सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं... त्यांना मार्गदर्शन करता यावं...म्हणून चक्क प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यरात्री स्वतः गाडीचे स्टेअरिंग हातात घेऊन युवा पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली.
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानानिमित्ताने दौर्‍यावर आहेत
 
हे सगळे दिवसभर सोबत असले तरी त्यांच्याशी पक्षाच्या बांधणीबाबत नीट चर्चा करता येत नसल्याचे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३.१७ असा जवळपास अडीच तासाची स्वतः ड्रायव्हिंग करत चर्चा केली. 
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या वागणूकीने युवा टीम प्रभावित झाली आणि त्यांनी त्यांना आलेला अविस्मरणीय क्षण सोशल मीडिया साईट्सवर शेअर केला आहे.

फोटो- सोशल मीडिया