गुरूवार, 1 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:44 IST)

काँग्रेस सारख्या पक्षालाही पायउतार व्हावे लागले-जयंत पाटील

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्यावर असलेल्या आस्थेमुळे ठिकठिकाणी कार्यकर्ते आवर्जून मोठ्या संख्येने बैठकीला गर्दी करत आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ना. जयंत पाटील म्हणाले की, "पराभव येत असतो, अपयश येत असतं. एकेकाळी देशात काँग्रेसचा काळ कधी ढळणारच नाही, अशी परिस्थिती होती. मात्र काँग्रेस सारख्या पक्षालाही पायउतार व्हावे लागले. देशात सत्तांतर पाहायला मिळालं. हे सर्व इच्छाशक्तीच्या जोरावरच झालं. त्यामुळं कार्यकर्त्यांनी इच्छाशक्ती ठेवून बुथ बांधणी करावी. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवावी."
 
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.