मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (11:03 IST)

शिवेंद्रराजेच नाही तर राष्ट्रवादी सोडलेले इतर नेतेही पक्षात परत येणार : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीबाबत नवाब मलिक यांना विचारले असता त्यांनी हा दावा केला. केवळ शिवेंद्रराजेच नव्हे तर पक्ष सोडून गेलेले इतर नेतेही पक्षात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात भेट झाली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेली ही दोन्ही नेत्यांची तिसरी भेट आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.