रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (22:19 IST)

राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा : मनसे

वाढीव वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलेत. या आदेशनानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून ऊर्जा मंत्री आणि राज्य सरकार विरोधात तक्रार करण्यात येतेय.
 
वाढीव वीज बिल कमी व्हावे यासाठी मनसेने या पूर्वी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलन देखील केले होते. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही वाढीव वीज बिल मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली होती.
 
काही दिवसांपूर्वी वीज बिल थकबाकी वसुल करा आणि जे थकबाकी देणार नाहीत त्यांची वीज खंडित करा असा आदेश ऊर्जा विभागाने दिले आहे त्या नंतर मनसे आक्रमक झाली आहे.