1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (07:27 IST)

वाचा, शरद पवार कोरोना लस कधी घेणार

Sharad Pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर  जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी शरद  पवारांनी आपण इतक्यात लस घेणार नसल्याचे सांगितले. “कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला बीसीजीची लस दिली. तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घे, असे सांगत त्यांनी मला बीसीजी लसीचा डोस दिला होता” असे शरद पवार यांनी सांगितले.
 
अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पातील एका इमारतीला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, “आता मी नगरला दोन खासगी रुग्णालयाच्या उद्घटनासाठी निघालो आहे. तिथे जाऊन परिस्थिती पाहतो. परिस्थिती गंभीर असेल, तर मुंबईला न जाता पुण्याला येऊन लसीचा डोस घेईन असे सांगितले. आता इथे परिस्थिती पाहिली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे मी आता पुण्याला न जाता थेट मुंबईला जाणार आहे.”