शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:50 IST)

बर्ड फ्लू जनजागृतीसाठी अनोखी स्पर्धा, मंत्री सुनील केदार यांनी सांगितले रोख रक्कम बक्षिस म्हणून देईन

देशात बर्ड फ्लूमुळे आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्लूने एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर तो शोधून द्या. त्याला मी रोख रक्कम बक्षिस म्हणून देईन, असं पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय. सध्या राज्यात बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे. अशावेळी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुनील केदार यांनी बर्ड फ्लूसंबंधी निर्माण झालेला फार्स थांबवला पाहिजे असं म्हटलंय. 
 
बर्ड फ्लू बद्दल राज्य सरकार संवेदनशिल आहे. बर्ड फ्लूमुळे सर्वात मोठं नुकसान राज्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचं होतं. बर्ड फ्लूचा फटका शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगार करणाऱ्या मुलांना बसतो. त्यामुळे हा मुद्दा संवेदनशिल आहे. उगाच याचा फार्स करु नका. बर्ड फ्लूमुळे माणसं मरत नाहीत. बर्ड फ्लू असेल तिथे एक किलोमीटरचा परिसर सिल करायला सांगितला आहे. या रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं सुनील केदार यांनी सांगितलं.