सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:45 IST)

आता काय करायचं ?, राज्य बोर्डाच्या परीक्षा आणि JEE परीक्षा एकाच वेळी

सरकारी यंत्रणांमुळे ताळमेळ नसल्याची बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई)ने इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा घोषित केल्या. त्यानंतर JEE परीक्षेची तारीख घोषित झाली. आणि दोन दिवसांपूर्वीच इयत्ता १०वी व १२वीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहिर झाली आहे. मात्र, राज्य बोर्डाच्या परीक्षा या JEE परीक्षेवेळीच येत असल्याने विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. 
 
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यातच आता परीक्षाही उशीराने होणार आहेत. अशातच आता दोन परीक्षा एकावेळी आल्याने नक्की काय करावे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. त्यामुळेच राज्य बोर्डाची १२वीची परीक्षा एप्रिल ऐवजी जूनमध्ये घेण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.