रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:27 IST)

प्रिया पहिल्यांदाच दिसणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

अनेक कलाकारांनी नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली. या वर्षात अभिनेत्री प्रिया बापट हिच्या एका कलाकृतीबद्दल अशीच उत्सुकता असणार आहे. प्रिया एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करते. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचं नाव ‘फादर लाइक' असं आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूर इथं याचं चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे. 
 
प्रिया म्हणाली, ‘हा माझा पहिलाच इंग्रजी चित्रपट आहे. परदेशात चित्रित होणाराही हा माझा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी माझ्या कुठल्याही मराठी वा हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात झालेलं नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या व्हिसा आणि इतर गोष्टींची तयारी मी करते. ऑडिशनमध्ये मला आठ दृश्ंय  द्यावी लागली. त्यामे माझी निवड होण्यापूर्वीच मी कुठे तरी या भूमिकेशी जोडली गेले. आदित्यनं निवड होण्यापूर्वीच कथा सगळ्या कलाकारांच्या हाती दिली. माझी निवड झाली याचा मला आनंद आहे.' तिच्या या कलाकृतीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.