शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (21:00 IST)

पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी करतील : सुप्रिया सुळे

“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी करतील,” असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
 
“धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यात गोंधळ निर्माण झाला आहे. काहीही समजेनासं झालं आहे. विषय अतिशय संवेदनशील आहे. कोणताही आरोप जेव्हा त्या कुटुंबावर होतो, त्या कुटुंबात इतरही लोक असतात. भारतातील कुटुंब म्हणजे कपल नसतं. ती फॅमिली कशातून जाते याचा आपण दोन्ही बाजूंचा आपण सर्वांनी विचार करायला हवा,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
 
“महाराष्ट्रातील पोलिसांवर आपल्या सर्वांचे प्रचंड प्रेम, विश्वास आणि आदर आहे. याप्रकरणी जे ट्वीस्ट येत आहे, त्याची पूर्ण जबाबदारी आपण पोलिसांवर विश्वासाने टाकूया. ते जे काही चौकशी करतील, त्यानंतर आपल बोलणं योग्य आहे,” असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.