शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (20:46 IST)

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू

बीड जिल्ह्यातीलआंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. लोखंडी गावातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील 10 गावांत अलर्ट जाहीर करण्यात आला असून कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव  झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 
 
आंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कोंबड्यांचा झालेला मृत्यू बर्ड फ्लू रोगानंच झाल्याचं स्पष्ट झालंय... त्यामुळे लोखंडी सावरगाव येथील बाधित कोंबड्यांचं वैज्ञानिक पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोखंडी सावरगाव शिवारातील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांचं वैज्ञानिक पद्धतीने कलिंग करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.