शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:54 IST)

फावल्या वेळात काय करायचं

महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्री कृष्ण वनात जातात.त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तु काय करणार भीमा. त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार, हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात.
 
भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटत तुमची, या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात.
 
भगवान पुढे युधिष्ठिराकडे (धर्मराजा) जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, "हे कृष्णा, काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे. "हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे. 
तोच अर्जुन म्हणतो, "कशाला!"
भगवान म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे, धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे, भीमाला स्वयंपाक, सहदेवाला घोडे राखायला, नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आचर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले.
 
धर्मराजा म्हणाले - भगवान आम्ही राजे आहोत, हे शिकुन काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे. भगवान म्हणतात जास्त विचार करू नका, वेळ आल्यावर कळेल सर्व. आणि हे सर्व इंद्र महालात जाऊन विविध काम शिकतात. 
 
बारा वर्षांचा वनवास संपतो. पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिला होता. (कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवाना दिला होताच पण त्याबरोबर असा डाव पण केला होता कि जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल). 
 
आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायच कुठे? त्यांनी भगवंतांना विचारलं. भगवान म्हणतात हिच ती वेळ आहे. तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला. ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची काम करतात. यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो, भीम बल्लव नावाचा आचारी होतो, अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदंग वादक होतो, सहदेव घोडे राखणारा, नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाच्या रानीची दासी होते. या प्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो.
 
तात्पर्य ~ या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात वाया घालवायचा नसतो. तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी. व्यायाम, योग, घरगुती कामे, कोडी सोडवणे, विद्यार्थानी पुढच्या वर्षाचा अभ्यास, मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे, गावात असाल तर शेतीची कामे अशी खुप काम आहेत आपल्याकडे. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन, अध्ययन करणे आवश्यक आहे. मिळालेल्या पदावर अहंकाररहित कसं राहायचं याची चालना मिळेलकोणाला धन मिळणार नाही. पण जवळ १० रूपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल. कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही
 
माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो आहे पण आनंद तर सोडाच, सुखही त्याला मिळत नाही कारण संसार दू:खालयम् अशाश्वतम्आंनदस्वरूप फक्त भगवानच आहे तो आनंद(सत-चित-आनंद) श्रीमद्भगवद्गीतेत, श्री ज्ञानेश्वरीत, श्रीमद भागवतात, तुकोबा ज्ञानोबा गाथेत अशा अनेक ग्रंथात आहे. आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी इतके ग्रंथ लिहुन ठेवलेत कि जर ते ग्रंथ एकमेकावर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडी तयार होईल. भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. हिच वेळ आहे मायबाप, इतके ज्ञानी व्हा कि जसे तुकोबा म्हणतात,
 
तुका सहज बोले जरी वाणी
वेदांत वाहे त्याच्याघरी पाणी।।

- सोशल मीडिया