1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (14:58 IST)

कलीयुगाचे पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे

short story
एका माणसाचं निधन होतं 
हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात सूटकेस घेऊन त्याच्या समोर प्रगटतात. 
भगवंत आणि त्या माणसामधील संवाद:
भगवंत - वत्स, चल आधीच उशिर झालाय ! 
माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.
भगवंत - माफ कर, अगोदरच फार उशीर झाला आहे.
माणूस - पण भगवंता, ह्या सूटकेस मध्ये काय आहे ?
भगवंत - जे आहे ते तुझंच आहे ! 
माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....
भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत.
माणूस - माझ्या आठवणी ?
भगवंत - त्या काळाशी संबंधित आहेत.
माणूस - माझं क्रतुत्व 
भगवंत - नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.
माणूस - माझे मित्र आणि परिवार 
भगवंत - नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते.
माणूस - माझी पत्नी व मुलं
भगवंत - ते तर तुझ्या ह्रुद्यात आहेत.
माणूस - मग माझं शरीर
भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं.
माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल
भगवंत - वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे.
 
माणसाच्या डोळ्यातून आता अश्रु येऊ लागतात. त्याने भगवंताच्या हातातून सूटकेस घेतली आणि मोठ्या आशेने उघडून बघितली तर काय.......रिकामी
 
निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत 
माणूस - म्हणजे माझं स्वत:चं काहीच नाही ? 
भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं.
माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??
 
जीवन हे क्षणभंगुर आहे. फक्त छान जगा, प्रेम करा. मिळालेल्या जिवनाचा उपभोग घ्या. रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे. बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे आणि मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आलं पाहीजे. 
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत आहे !!!
\कलीयुगाचे पर्व आहे, 
प्रत्येकालाच इथे गर्व आहे !
मी आहे तरच सर्व आहे, 
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!
अरे वेड्या..! कुणा वाचून कुणाच राहात नसतं..आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!
 
-सोशल मीडिया