बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (16:31 IST)

बापरे, सॅनिटायझरचा स्फोट होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात सॅनिटायझरचा स्फोट होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या.

त्यावेळी त्या कचऱ्यात सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश होता. त्या बाटलीमध्ये थोडेसे सॅनिटाझर शिल्लक होते. दरम्यान, कचऱ्याने पेट घेताच सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. यामध्ये सुनीता काशीद आगीत होरपळल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.