सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (16:24 IST)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती काँग्रेसममधील सूत्रांनी दिली आहे. 
 
बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर या पदासाठी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर ,नाना पटोले, विजय वड्डेटीवार, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आहेत. 
 
जून २०१९ मध्ये बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. सरकारमधील जबाबदारी आणि पक्षातील इतर जबाबदारी असल्याने आणि नवीन चेहर्‍याला संधी मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष सोडण्याची इच्छा बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली आहे.