शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जानेवारी 2021 (08:59 IST)

'संभाजीनगर'ला काँग्रेसचा विरोध : बाळासाहेब थोरात

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करतांना, जो किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यात शहराच्या नामकरणाचा समावेश नाही. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध आहे आणि पुढेही राहणार असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच शहराचे नाव बदलून विकास होत नसतो, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मित्रपक्ष शिवसेनेला लगावला आहे. 
 
ते म्हणाले की, सरकार तीन पक्षाची असो की, एक त्यात मतभेत, कुरबूर होतच असते. परंतु त्यातही आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून सर्व समस्या आणि वादावर यशस्वीपणे तोडगा काढत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे ते म्हणाले. सध्या औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना अग्रही असल्याचा सवाल थोरात यांना उपस्थित केला असता, त्यावर बोलतांना ते म्हणाले घटनेच्या प्रास्तावनावर आधारीत महाविकास आघाडीचा किमानसमान कार्यक्रम आहे. त्यामुळे 'संभाजीनगर'ला काँग्रेसचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. अगामी मनपा निवडणूकीबाबतही त्यांनी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे म्हणाले.