1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (17:57 IST)

काँग्रेस पक्ष सर्व 227 जागांवर लढण्यासाठी तयार : भाई जगताप

Congress party
आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व 227 जागांवर लढण्यासाठी तयार आहे, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप  यांनी केले. भाई जगताप यांनी शुक्रवारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेब यांच्या सर्व स्मृतिदिनाला मी नेहमी येतो, राजकारणाच्या पलिकडे काही व्यक्तींचं स्थान असतं, इथे प्रेरणा मिळते, आज आणि उद्या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणा स्थळावर जाणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. 
 
यावेळी मराठा आरक्षण हा भावनिक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचं काम महाविकास आघाडीने केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील समाजात या मुद्द्यावरुन तेढ निर्माण करु नये, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.