मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (16:26 IST)

“तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!!”

मुंबईत कोरोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी ट्विट करत रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल इशारा दिला. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असं पोलिसांनी म्हटलं. 
 
याच संदर्भातील एका प्रकाशित बातमीचं कात्रण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोस्ट केलं आणि त्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर तुफान टीका केली. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईत नाईट लाइफ सुरू करण्यासाठी आग्रही होती. त्याच मुद्द्याचा आधार घेत त्यांनी टीका केली. “तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!!”, अशा प्रकारे अगदी मोजक्या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.