शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (08:29 IST)

मनसेकडून मुंबईत अ‍ॅमेझॉन विरुद्ध फलकबाजी

मराठी भाषेवरुन पुन्हा एकदा मनसेचा वाद पेटल्याचे समोर आले आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईत अ‍ॅमेझॉन विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’,असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहिम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत. 
 
याआधी अ‍ॅमेझॉनआणि फ्लिपकार्टच्या ऑनलाईन शॉपिंग Appमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने खळखट्याक केला होता. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयावर धडक देत त्यांना सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही मनसेने दिली होती.