रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (16:56 IST)

राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडीत

राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी स्पोर्टस् सायन्स, स्पोर्टस् टेक्नॉलॉजी व स्पोर्टस् कोचिंग व ट्रेनिंग हे 3 अभ्यासक्रम सुरू होतील. नवे विद्यापीठ निर्मिती व इतर प्रशासकीय बाबींसाठी एकूण 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात 200 कोटी अनावर्ती खर्चासाठी, तर 200 कोटी कॉर्पस् फंड असेल. राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाला विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली.  
 
हे विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून (2021-22) सुरू करण्याचा मानस आहे. पहिल्या वर्षी स्पोर्टस् सायन्स, स्पोर्टस् टेक्नॉलॉजी व स्पोर्टस् कोचिंग व ट्रेनिंग हे 3 अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. प्रत्येक अभ्यासक्रमात 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर मागणी व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाची व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.