गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बार्सिलोना , मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (14:21 IST)

मेस्सीच्या गोलने बार्सिलोनाची पराभवाची मालिका खंडित

स्टार फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीगमध्ये सलग पराभवाची मालिका खंडित करताना लेवांटेचा 1-0 ने पराभव केला. बार्सिलोना आता 9 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. बार्सिलोनाकडून मेस्सीने 76 व्या मिनटाला एकमेव गोल केला जो अखेरीस विजयी सिध्द झाला.
 
यापूर्वी बार्सिलोनाला दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या सामन्यात त्यांना  कॅडिजने पराभूत केले होते व त्यानंतर मुव्हमेंट्‌सने चॅम्पियन्स लीगमध्ये 3-0 ने मात दिली होती. दरम्यान बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनाल्ड कॉमेन यांनी सांगितले की, अधिकांश संघ मेस्सीवरच लक्ष केंद्रित करतात व त्याला घेरण्यासाठी अनेक खेळाडूंचे कडे केले जाते. मात्र आज त्याने आपल्यातील दम दाखवूनच दिला.