सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (10:02 IST)

पुण्यात गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढीची नोंद

पुण्यात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. नागपूरही कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. पण आता मात्र, आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपुरात सक्रिय कोरोना बाधीतांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 12 दिवसांत उपचार घेत असलेले 40 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 12 दिवसांत प्रथमच सक्रिय कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 76 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 30 मृत्यू, 658 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. संसर्गाची साखळी वेगाने वाढत असताना पालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
 
दरम्यान, राज्यातही कोरोनासंबंधी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी कोविड-19 ची 7 हजार प्रकरणं समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसांत 7,089 समोर आले असून 165 लोकांचा मृत्यू झाला आहे तर सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 
 
राज्यात सोमवारी 15,656 रुग्णांचा कोविड -19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात एकूण 15 लाख 35 हजार 315 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा हा 40,514 वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत 12 लाख 81 हजार 896 लोक बरे झाले आहेत. तर सध्या एकूण 2 लाख 12 हजार 439 सक्रिय प्रकरणं आहेत.