1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:21 IST)

पोलीस दलात कोरोना प्रादुर्भाव अजूनही मोठ्याप्रमाणात सुरूच

Corona outbreaks
राज्यात गेल्या २४ तासात १६१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २१ हजार ९८८ पोलिसांना कोरोनाची झाली आहे. तर आतापर्यंत २३५ पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.  
 
आतापर्यंत आढळलेल्या २१,९८८ कोरोनाबाधित पोलिसांमध्ये २३९८ पोलीस अधिकारी आणि १९,५९० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १८ हजार ३७२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये १९५४ पोलीस अधिकारी आणि १६,४१८  पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.