मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (08:51 IST)

ONGC मध्ये आगीनंतर भीषण स्फोट

गुजरातच्या सूरत येथील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन मध्ये बुधवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
 
बुधवारी रात्री लागलेल्या आगीनं हळूहळू रौद्र रूप धारण केलं. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहे. या प्लॅन्टमध्ये किती लोक होते तसेच कोणती जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. 
 
याचा एक व्हिडिओ व्हायल होत असून त्यात आगीचे मोठे गोळे दिसत आहेत. त्यावरून ही आग मोठी असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
याआधी याच प्लॅन्टमध्ये 2015 रोजी देखील आग लागली होती. या आगीत 15 जणांचा होरपळून त्यावेळी मृत्यू झाला होता.