आघाडीतील तीन पक्षातून तुमच्या पक्षात गेलेले आमदार आता येणार : अजित पवार

ajit panwar
Last Modified बुधवार, 16 डिसेंबर 2020 (16:40 IST)
महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यांत पडेल, सहा महिन्यांत पडेल अशा वल्गना भाजप नेते करत होते. पण आता वर्षानंतरही सरकार भक्कमपणे चालले आहे. आता आघाडीतील तीन पक्षातून तुमच्या पक्षात गेलेले आमदार आता येणार आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. पुढील चार महिन्यांत तुम्हाला ते दिसेलच. मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि सांगून करतो. परत म्हणू नका तुम्ही आधी का सांगितले नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना दिले.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले की, विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने भाजप नेते नैराश्यात आहेत. शिक्षक व पदवीधर मतदार हा सुशिक्षित व चालू घडामोडीवर लक्ष ठेवणारा मतदार असतो. भाजपची हक्काची नागपूर, पुणे पदवीधरची जागा गेल्याने वाट्टेल ते आरोप करत आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत कोणताही संभ्रम नसताना सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत पण तुम्हाला त्यात यश मिळू देणार नाही.

ओबीसी आरक्षणाबाबत विरोधक दिशाभूल करत आहेत. ओबीसींमध्ये इतरांना सामील करण्याची आवई उठवली जात आहे. मराठा समाजाची भीती दाखवली जात आहे. मराठा समाजालाही त्यांचे हक्क दिले जातील. मात्र, ओबीसींमध्ये त्यांचा समावेश केला जाणार नाही, याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधक नैराश्यात गेले आहेत, असेही अजित पवार म्हणाले.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

GT vs RR 2022: गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली

GT vs RR 2022: गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली
IPL 2022 चा पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकात्याच्या ...

सरकार बदलले, निजाम बदलला पण परिस्थिती तशीच राहिली; आता ...

सरकार बदलले, निजाम बदलला पण परिस्थिती तशीच राहिली; आता पाकिस्तानवर नवे संकट ओढवले आहे
सरकार बदलले, निजाम बदलला पण पाकिस्तानची स्थिती बदलली नाही. पाकिस्तानातील आर्थिक संकट ...

कोयना धरणातील पाणी प्रकल्पासाठी वळवावे; मुख्यमंत्र्यांकडे ...

कोयना धरणातील पाणी प्रकल्पासाठी वळवावे; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबत आता काही ...

"शिवसेनेकडून सहाव्या जागेचा विषय संपला" संजय पवार शिवसेनेचा ...

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सहाव्या जागेसाठी ...

भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर ...

भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; शिवसेना काय उत्तर देणार?
उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या ...