बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (17:25 IST)

सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गोंधळ, कठोर शब्दात भरला दम

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गोंधळ झाला. यावेळी संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच  संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरला आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी करत राडा घातला. यावेळी सुप्रिया सुळे यांनाही काही काळ भाषण थांबवावं लागलं.
 
संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे या दोघांमध्ये विधानसभेच्या तिकीटवरुन नाराजी होती. संजय वाकचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, परंतु दत्ता गोर्डे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे वाकचौरे यांचे समर्थक नाराज होते. सुप्रिया सुळे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त पैठणमध्ये आल्या असताना या नाराजीचं पर्यवसान तुफान राड्यात झालं. या गोंधळामुळे कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला.