बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (11:49 IST)

पत्रकारांच्या सुरक्षेवरून सुप्रिया सुळे यांचे ट्विट

राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपला साथ दिल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. बातम्या कव्हरकरण्यासाठी पत्रकारांची प्रचंड धावपळ उडालेली आहे. सर्वात आधी आणि ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी जीवाची तमा न बाळगता काम करणार्‍या पत्रकारांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करून स्वतःची काळजी घ्या, असे भावनिक आवाहन केले आहे. 
 
राज्यातील सत्तापेचाकडे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र वेळात वेळ काढून पत्रकारांच्या सुरक्षेवरून एक ट्विट केले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, माध्यमातील मित्रि-मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचे महत्त्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. 
 
मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. हे ट्विट करून सुळे यांनी पत्रकारांविषयी आपल्या मनात असलेली भावना व्यक्त केली आहे. सुळे यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे ट्विट केले आहे.