1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (09:46 IST)

दोघा पवारांमध्ये ट्वीटर वार अजित पवार यांना दिले शरद पवार यांनी हे उत्तर

In two Pawar
काका पुतण्या वाद काही महाराष्ट्रात नवीन नाही. आता तो वाद पवार यांच्या घरात सुरु झाला आहे. यामध्ये अजित पवार यांनी माध्यमातून व्यक्त होणे टाळले मात्र त्यांनी सोशल मिडीयावर आपले मत व्यक्त केले आहे. या उत्तरला शरद पवार यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. त्यामुळे आता दोघा पवारांमध्ये ट्वीटर वार सुरु झाले आहे.
 
अजित पवार म्हणाले की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट त्यांनी केले आहे.
 
अजित पवारांच्या या ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र अजित पवारांच्या  ट्वीटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार सडेतोड  उत्तर दिले  आहे.
 
काय म्हणाले शरद पवार?
"भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे." असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
अजित पवार परतणार नाहीत 
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही शांत असलेल्या अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार हे पहिल्यादांच ट्विटवर सक्रिय दिसून आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री झाले त्या बद्दल सर्वांचे आभार मानले आहे,  यातून त्यांनी आपण निर्णयावर ठाम असून, त्यावरून माघार घेणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.