बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (09:42 IST)

अजित पवार २४ तासांनी घराबाहेर, गेले थेट मुख्यमंत्री यांच्या घरी वर्षा बंगल्यावर

राज्याच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडली आणि तशी कबुली सुप्ल्यारिया सुळे यांनी दिली आहे, दिवसभरातील सर्व घडामोडींनतर बाहेर न पडलेले अजित पवार रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.
 
वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरु होती. यात मुख्यतः सुप्रीम कोर्टातील सुनावणीपासून इतर राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे. त्यांच्या सोबत  भाजप नेते विनोद तावडे, भुपेंद्र यादव आणि गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
 
असे मानले जात आहे की, अजित पवारांसोबत 27 आमदार आहे. अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपद आणि 15 महामंडळ भाजप देण्याच्या तयारीत असून, अजित पवार जवळपास 10 वाजता मुंबईतील घरातून बाहेर पडले. यानंतर जवळपास 20 मिनिटानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आज सकाळी सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय देणार आहे, त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देणार यावर सरकारचे पुढील भवितव्य ठरले आहे.