मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (14:05 IST)

पुण्याचे नाव बदलून 'जिजापूर' करा - संभाजी ब्रिगेड

Change
एकीकडे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरत असताना आणि त्यावरून राजकारण सुरू झालं असताना, दुसरीकडे पुण्याच्या नामांतराची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
 
पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडची आहे.  
"राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुण्याला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचं नाव देऊन पुण्याचं जिजापूर असं नामांतर करावं," असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले.
 
"राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी 'बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालवून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेलं आहे," असंही ते म्हणाले.