शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (15:52 IST)

पुण्यात ३१ डिसेंबरची नियमावली जारी, ११ वाजल्यानंतर संचारबंदीची घोषणा

पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आज एक आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी ३१ डिसेंबरची नियमावलीसंदर्भातील दहा मुद्द्यांची माहिती दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये कोणत्या गोष्टी कधीपर्यंत सुरु राहतील तसेच नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत.

यापैकी पाचवा मुद्दा हा होम डिलेव्हरीसंदर्भात आहे. पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ रात्री पावणे अकराला बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहे, असं या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.