गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (12:08 IST)

चाणक्य कथा : तीन पुतळे एकसाखरे मग किमतीत अंतर का?

महाराज चंद्रगुप्त यांचे दरबार लागले होते. सर्व सदस्य आपापल्या जागी बसलेले होते. महामंत्री चाणक्य दरबाराचे काम बघत होते. महाराज चंद्रगुप्त ह्यांना खेळणी फार आवडायचे. दररोज त्यांना एक नवीन खेळणी लागायचे. आज काय नवे आहे ? विचारल्यावर महाराजांना कळले की एक नवे खेळणी घेऊन एक व्यापारी आला आहे. त्या व्यापाऱ्याचे म्हणणे आहे की हे खेळणी नवीन आहे आणि आजतायगत ते खेळणी कोणी बघितले नाही आणि त्यांच्या बद्दल काही ऐकले नाही. असं ऐकून महाराजांनी त्या व्यापाऱ्याला बोलवायला सांगितले.

तो व्यापारी दरबारात आला आणि त्याने आपल्या पिशवी मधून तीन पुतळे काढून ठेवले आणि महाराजांना म्हणाला -' अन्नदाता हे पुतळे दिसायला जरी हे एक सारखे आहे पण हे खूप विशेष आहे. पहिल्या पुतळ्याची किंमत एक लाख स्वर्ण मुद्रा आहे, दुसऱ्याची किंमत एक हजार स्वर्ण मुद्रा आहे आणि तिसऱ्याची किंमत फक्त एक स्वर्ण मुद्रा आहे. 
 
महाराजांनी त्या तिन्ही पुतळ्यांना बघितले पण त्यांना त्या मध्ये काहीच अंतर दिसले नाही, तरीही त्यांच्या किमतीत अंतर का? या प्रश्नाने महाराजांना अस्वस्थ केले. अखेर त्यांनी आपल्या सभेतील सदस्यांना ते पुतळे दिले आणि ह्यांच्या मध्ये काय अंतर आहे आम्हाला सांगा असे म्हटले. पण कोणी देखील त्यामधील अंतर शोधू शकला नाही. शेवटी चंद्रगुप्तने आपल्या गुरु आणि महामंत्री चाणक्याला विचारले. 
 
चाणक्याने पुतळे लक्ष देऊन बघितले आणि सैनिकाला तीन पेंढे आणायला सांगितले. सैनिकाने तीन पेंढे आणले पैकी चाणक्याने एक पेंढा पहिल्या पुतळ्याच्या कानात घातला तर तो पेंढा त्या पुतळ्याच्या पोटात गेला, नंतर त्या पुतळ्याचे ओठ हालले आणि नंतर बंद झाले. हे सर्वांनी बघितले. 
 
नंतर त्यांनी दुसऱ्या पुतळ्याच्या कानात पेंढा घातला आणि सर्वांनी बघितले की तो पेंढा त्या पुतळ्याच्या दुसऱ्या कानातून बाहेर आला. पुतळ्याने काहीच हालचाल केली नाही. हे बघून सर्वांना आश्चर्य वाटले. आता पुढे काय होणार सर्वांनाच उत्सुकता वाढली होती. चाणक्याने तिसऱ्या पुतळ्याच्या कानात पेंढा घातला आणि बघतात तर काय पेंढा त्या पुतळ्याच्या तोंडातून बाहेर आला आणि त्या पुतळ्याचे तोंड उघडले गेले. पुतळा हालचाल करीत होता जणू त्याला काही सांगायचे आहे. 

चंद्रगुप्त ने हे काय आहे आणि या पुतळ्यांची किंमत वेगवेगळी का आहे ?  विचारल्यावर चाणक्य म्हणाले. 'महाराज चारित्र्याचे चांगले असणारे काही गोष्टी ऐकल्यावर आपल्या मनातच ठेवतात आणि त्याची शहानिशा केल्यावरच बोलतात. हेच त्यांचे वैशिष्ट्ये आहे. या पहिल्या पुतळ्यापासून आपल्याला हेच शिकायला मिळते. त्यासाठी या पुतळ्याची किंमत एक लाख स्वर्ण मुद्रा आहे.
 
काही लोक स्वतःमध्येच गुंतलेले असतात. लोकांच्या गोष्टीला दुर्लक्षित करतात. त्यांना स्वतःचे वाहावाह करण्याची काहीही इच्छा नसते. असे लोक कोणाला त्रास देत नाही. दुसऱ्या पुतळ्यापासून हीच शिकवण मिळते. म्हणून या पुतळ्याची किंमत एक हजार स्वर्ण मुद्रा आहे. 
 
काही लोक कानाचे कमकुवत असतात आणि पोटाने देखील कमकुवत आणि कच्चे असतात. असे लोक काही गोष्ट कळतातच त्याची दिवण्डी पिटवतात, ती गोष्ट खरी आहे किंवा नाही ह्याची पुष्टी देखील करीत नाही. त्यांना तर सर्वांना सांगायचे असते. हेच कारण आहे की या पुतळ्याची किंमत फक्त एक स्वर्ण मुद्रा आहे.