शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (17:18 IST)

वाईट काळाची बचत

एक शेतकरी होता. पीक कमी आल्यामुळे तो काळजीत होता. घरात देखील फक्त 11 महिने चालेल तेवढेच रेशन होते. बाकी एक महिन्याचे रेशन कुठून येईल ह्या गोष्टीची काळजी त्याला होत होती. 
 
त्या शेतकऱ्याच्या सुनेच्या लक्षात आले की बाबा कोणत्या तरी काळजीत आहे तिने त्या शेतकऱ्याला विचारले की -' बाबा आपण फार काळजीत दिसत आहात काय झाले कशाची काळजी घेत आहात ? तेव्हा त्याने आपल्या सुनेला काळजीचे कारण सांगितले. 
 
शेतकऱ्याची गोष्ट ऐकून सुनेने त्याला सांगितले की बाबा आपण काळजी करू नये एका महिन्याच्या रेशनची देखील व्यवस्था होईल. 
त्यांचे संपूर्ण वर्ष चांगले गेले तेव्हा शेतकऱ्याने आपल्या सुनेला विचारले की असे शक्य कसे झाले?
 
सून फार हुशार होती तिने सांगितले- की जेव्हा आपण मला सांगितले की एक महिन्याच्या रेशनची व्यवस्था कशी होणार त्या दिवसापासूनच मी एक एक मूठ धान्य काढून वेगळे ठेवले त्यामुळे बाराव्या महिन्याची व्यवस्था होऊ शकली. 
 
तात्पर्य- या कहाणी पासून आपल्याला शिकवण मिळते की जीवनात बचत करण्याची सवय लावावी. जेणे करून वाईट काळात कामी येऊ शकेल.