तसं अजिबातच वाईट नव्हतं वर्ष हे...
तसं अजिबातच वाईट नव्हतं वर्ष हे,
शिकवून गेला खूपसे काही हे सत्य आहे,
किंमत माणसांची खरी खरी कळली,
अहंकाराची नशा चक्क धुळीस मिळाली,
तावून सुलाखून निघालेत परस्परातील सम्बन्ध,
किती पक्के आहेत आपले असलेले ऋणानुबंध,
घरच्या अन्नाची किंमत चांगलीच कळली,
खरं खुर कळलं आपली आई कित्ती खपली,
कपडे सारेच कपाटात घडी मारून बसलेत,
बाप लेक नकळतपणे जवळ मात्र आलेत,
गरजा कमी होऊ शकतात,हे कळले मात्र,
देवाच्याच हाती असतात या जगाची सूत्र,
असो यातूनच धडा चांगला घेऊ या आपणही,
किंमत प्रत्येक गोष्टीची मोजावी लागते बरीच काही!
....अश्विनी थत्ते.