रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : सोमवार, 15 जुलै 2024 (09:05 IST)

तेनालीराम कहाणी : लाल मोर

Peacock Feather
विजयनगरचे राजा कृष्णदेव राय यांना दुर्मिळ आणि अद्भुत वस्तू गोळ्या करण्याचा छंद होता. त्यांच्या दरबारातील प्रत्येक जण त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि पैसे मिळविण्यासाठी काहीं न काही दुर्मिळ वस्तू आणायचे आणि पैसे घ्यायचे.
 
एकदा एका दरबाऱ्याने एक युक्ती केली त्याने राजा कडून पैसे घ्यावयाचा विचार केला आणि एका मोराला रंगाच्या तज्ज्ञ कडून लाल रंगाने रंगविले आणि मोराला घेऊन थेट महाराजांच्या राज्यसभेत पोहोचला आणि म्हणाला की 'महाराज हे बघा लाल मोर. मी ह्या मोराला आपल्यासाठी बऱ्याच लांबून मागविले आहे.
 
राजा कृष्णदेव त्या मोराला बघून आश्चर्यात पडले. त्यांना त्या मोराकडे बघून आश्चर्यच झाले 'लाल मोर अति विलक्षणीय होता. ते म्हणाले की 'खरंच आपण आमच्यासाठी खूपच अद्भुत वस्तू मागविली आहे. आम्ही ह्या मोराला राष्ट्रीय उद्यानात सुरक्षितपणे ठेवू. आता आम्हाला सांगा हे मोर आणण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागले?
 
दरबाऱ्याला स्वतःची स्तुती ऐकून आनंद झाला आणि तो म्हणाला की महाराज 'मी आपल्यासाठी ही दुर्मिळ वस्तू आणण्यासाठी आपल्या दोन सेवकांना देशभर प्रवास करण्यासाठी पाठविले होते वर्षभर त्यांनी प्रवास केला आणि मग हा लाल रंगाचा मोर सापडला. 'मी आपल्या त्या सेवकांवर सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च केले आहेत.' 
 
त्या दरबाऱ्याचे बोलणे ऐकून राजाने आपल्या मंत्र्याला त्या दरबाऱ्यास पंचवीस हजार रुपये राज्यकोषातून देण्याची आज्ञा दिली आणि त्या दरबाऱ्याला सांगितले की एका आठवड्यानंतर तुला बक्षीस दिले जाईल. दरबारी राजाचे बोलणे ऐकून आनंदी झाला आणि त्याने तेनालीरामकडे कुत्सित नजरेने बघितले आणि हसू लागला.
 
तेनालीरामाला त्याच्या हसण्याचा अर्थ समजला आणि त्या वेळी त्याने शांतच राहण्याचा विचार केला. तेनालीरामाला देखील कळले होते की लाल रंगाचे मोर कोणत्याही प्रदेशात आणि कुठे ही आढळत नाही. तेनालीरामाला कळाले की या मध्ये या दरबाऱ्यांची काही तरी युक्ती आहे. दुसऱ्याच दिवशी तेनाली ने त्या रंगाच्या तज्ज्ञाला शोधून काढले ज्याने त्या मोराला लाल रंगाने रंगले होते. तेनाली आपल्या सह चार मोर घेऊन गेले आणि त्यांना लाल रंगाने रंगविले आणि राजाच्या राज्यसभेत नेले आणि म्हणाले' महाराज त्या दरबाऱ्याने तर पंचवीस हजारात एकच मोर आणला होता पण मी तर पन्नास हजारात त्या पेक्षा अधिक सुंदर असे चार मोर आणले आहे. 
 
राजाने बघितले तर त्या दरबाऱ्याच्या मोरापेक्षा अधिक सुंदर मोर तेनालीरामाकडे होते. राजाने त्वरितच मंत्र्याला तेनालीरामाला राज्यकोषातून 50 हजार रुपये देण्याची आज्ञा दिली. तेनालीराम म्हणाले की महाराज या पुरस्काराचे खरे मानकरी हे कलाकार आहे ज्यांनी त्या मोरांना रंगविले राजा ला सर्व घडलेले समजायला 
 
अजिबात वेळ लागला नाही. त्यांना कळाले की कसे त्या दरबाऱ्याने त्यांना फसवून पैसे लुबाडले आणि त्यांची फसवणूक केली. त्यांनी लगेचच त्या दरबाऱ्याला पंचवीस हजार रुपये परत देण्यास सांगितले आणि वरून त्याला 5 हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश दिला. तसेच रंगकाऱ्याला पुरस्कार दिला. दरबाऱ्याला दंड म्हणून 5 हजार रुपये भरावे लागले आणि राजा कृष्णदेव रायांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात 5 हजार रुपये देखील गमवावे लागले.