गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : गुरूवार, 6 जून 2024 (09:20 IST)

अंगठी चोर : तेनालीरामची रंजक कहाणी

महाराज कृष्णदेव राय हे मौल्यवान रत्नजडित अंगठी घालायचे. जेव्हा पण ते कधी राज्यसभेत यायचे त्यांची नजर आपल्या मौल्यवान अंगठीवर असायची. ते आपल्या राजमहालाच्या प्रत्येका जवळ आपल्या अंगठी बद्दल संभाषण करत होते. एकदा राजा कृष्ण देव उदास होऊन आपल्या सिंहासनावर बसले होते. तेनालीने त्यांना त्यांच्या उदास असण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी माझी अंगठी गहाळ झाल्याचे सांगितले आणि त्यांना संशय आहे की त्यांच्या 12 अंगरक्षकांपैकीच कोणी चोरली आहे. राजा कृष्णदेव यांच्या अवती भोवती त्यांच्या सुरक्षेचा काटे कोर बंदोबस्त असायचा की कोणी सामान्य माणूस देखील त्यांच्या जवळ येऊ शकतं नव्हता. 

तेनालीरामाने महाराजांना आश्वस्त केले की महाराज मी चोराला लवकरच आपल्या समोर आणेन. हे ऐकतातच महाराज आनंदी झाले त्यांनी आपल्या सर्व पहारेकरी आणि अंगरक्षकांना बोलाविले. तेनाली म्हणाले की महाराज आपली अंगठी या 12 अंगरक्षकांपैकीच कोणा एकानेच चोरली आहे आणि मी त्या चोराला शोधून काढेन. जो खरा आहे त्याला घाबरण्याची काहीच गरज नाही पण जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळेलच त्यानी शिक्षा भोगण्यासाठी तयार व्हावं.
 
तेनालीरामाने त्यांना सांगितले की आपण सगळे माझ्या बरोबर चला आपल्याला देवीच्या देऊळात जायचे आहे. 
महाराज म्हणाले 'अरे हे काय तेनाली आपल्याला तर चोराचा सुगावा लावायचा आहे तर देऊळात दर्शन करायला का जायचे ? महाराज आपण काळजी करू नका लवकरच चोर आपल्या समोर असेल आपण धीर ठेवा. 'असे म्हणून तेनाली देऊळाच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांना काही सूचना दिल्या. नंतर त्यांनी त्या अंगरक्षकांना सांगितले की तुम्हाला पाळी-पाळीने देऊळात जाऊन देवी आईच्या पायाला हात लावून लगेचच बाहेर पडायचे आहे. असं केल्याने देवी आई मला आज रात्री त्या चोरांचे नाव स्वप्नात येऊन सांगेल. 
 
सर्व अंगरक्षक पाळी-पाळीने जाऊन देवी आईच्या पाया पडून बाहेर पडले. जसे अंगरक्षक बाहेर यायचे तेनालीराम जाऊन त्यांच्या हाताचा वास घ्यायचे आणि एका रांगेत उभे राहायला सांगायचे. महाराज म्हणाले की 'आता चोराचा शोध तर सकाळीच लागेल कारण देवी आई आज तुला दृष्टांत देईल' तो पर्यंत ह्यांचे काय करावे ?' नाही महाराज चोराचा शोध लागला आहे आणि सातव्या नंबरचा अंगरक्षकच चोर आहे. हे ऐकतातच अंगरक्षक पळू लागला तिथे उभे असलेले शिपायांनी त्याला धरले आणि तुरुंगात टाकले.
 
राजा आणि सर्व जण आश्चर्यात पडले की अखेर चोराला तेनालीरामाने शोधले कसे आणि त्याला स्वप्न न पडतातच कसे कळाले की हाच चोर आहे.तेनालीरामाने सर्वांची जिज्ञासा शांत करीत सांगितले की महाराज मी पुजाऱ्यांना देवी आईच्या मूर्तीच्या पायाला अत्तर लावायला सांगितले होते ज्यामुळे ज्याने देवी आईचा पायाला हात लावला तर त्याच्या हाताला अत्तराचा सुवास लागला. पण जेव्हा मी या अंगरक्षकाच्या हाताचा वास घेतला तेव्हा त्याच्या हाताला वास लागला नाही कारण त्याच्या मनात भीती होती आणि त्या वरून हाच चोर आहे हे कळले 'राजा कृष्णदेव राय ने तेनालीरामाच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली आणि स्वर्ण मुद्रांनी त्यांना सन्मानित केले.