सोनू, बिल्लू आणि भुईमुगाच्या शेंगा
Motivational Kids Story एक होता बिल्लू... त्याकडे काही पैसे नसायचे. तो गरिबीने नेहमीच त्रस्त राहत होता. तो रोज भुईमुगाच्या दुकानात जायचा, 1 रुपया देऊन भुईमूग देत असे आणि पुढे निघून जात असे.
भुईमूग विकणारा सोनूचा मित्र झाला होता. बिल्लूने त्याच्या गरिबीचा उल्लेखही केला... तर सोनू त्याला म्हणाला तू काही बचत का नाही करत?
बिल्लू म्हणाला : गरीब माणसाची चेष्टा काय करता? माझ्याकडे इतके पैसे आहेत तरी कुठे की मी ते साठवायचे?
बिल्लू नाराज होऊन निघून गेला पण सोनू नाही...
बिल्लू दररोज भुईमुगाच्या शेंगा खायचा आणि निघून जायचा...
काही महिने निघून गेले
सोनूने एके दिवशी बिल्लूला टोपलीभरुन शेंगा दिल्या.
सोनू : घे भावा या तुझ्या शेंगा
बिल्लू : पण एवढ्या ??? मी या कशा नेऊ शकतो?
सोनू : कारण या तुझ्याच आहे....
बिल्लू : काय सांगतोस ? माझ्या कशा काय या शेंगा ? मी तर इतक्या शेंगा खरेदी पण करु शकत नाही...
सोनू : पण या शेंगाचे तु मला पैसे देऊन चुकला आहे...
बिल्लू : अरे, हे काय काही तरी बोलतोयेस ?
सोनूने गुपित उघडले : बघ बिल्लू, तु माझ्याकडून दररोज शेंगा घेतोस... मी दररोज काही शेंगा कमी देऊन वेगळ्या काढून ठेवत होतो... बघ आज किती शेंगा जमा झाल्या आहेत...
बिल्लूने टोपली हातात घेतली तर त्याचा विश्वासच बसत नव्हता की आज पैसे न देता एवढ्या शेंगा माझ्या आहेत..
सोनूने म्हटलं की काय तुला एकदा तरी जाणवलं की मी तुला कमी शेंगा देत आहे... नाही ना... याच प्रकारे आपल्या खर्च्यातून काही प्रमाणात कपात करुन बचत करता येते... की कधी न कधी कामास येते.. ही होती भुईमुगाच्या शेंगांची जादू.... काही कळंल????
बिल्लूला सर्व समजून गेले... आज सोनूने त्याला बचत कशा प्रकारे करता येते हे शिकवून दिलं होतं.. आणि आपली मैत्री कशी निभवावी हे देखील..
या कहाणीतून हा धडा मिळतो की आपण सर्वांनी येणाऱ्या दिवसांसाठी काही प्रमाणात बचत केली पाहिजे.