सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (15:09 IST)

आणि राजा वचन विसरले..

राजा अकबर बिरबलाच्या हजरजबाबीचे खूप कौतुक करायचे. एके दिवशी त्यांनी राज्यसभेत बिरबलाचे भरभरून कौतुक करून बिरबलाला काही बक्षिसे देण्याची घोषणा केली. बरेच दिवस झाल्यावर बिरबलाला बक्षीस काही मिळाले नाही. बिरबलाला प्रश्न पडला की आता राजाला बक्षिसाची आठवण कशी करून द्यावी? एके दिवशी महाराज अकबर यमुनेच्या काठी संध्याकाळी फिरायला निघाले. बिरबल त्यांच्या समवेत होते. अकबराने तेथे एका उंटाला फिरताना बघितले. अकबराने बिरबलाला विचारले, 'बिरबल सांगा की ह्या उंटाची मान वाकडी कशाला आहे?' बिरबलाने विचार केला की महाराजांना त्यांच्या वचनाची आठवण करून देण्याची हीच संधी आहे', त्यांनी उत्तर दिले की महाराज हा उंट देखील एखाद्याला वचन देऊन विसरला होता, ज्यामुळे त्याची मान वाकडी झाली. 
 
महाराज, असे म्हणतात की जे कोणी आपल्या वचनाला देऊन विसरून जातो त्याची मान अशा प्रकारे वाकडी होते. त्यांना देव अशी शिक्षा देतो ही एक प्रकाराची शिक्षाच आहे. अकबराला त्वरितच लक्षात येत की ते देखील बिरबलाला दिलेले वचन विसरलेले आहे. त्यांनी बिरबलाला त्याच क्षणी त्यांच्या सह महालात येणाचे सांगितले आणि महालात पोहोचतात बिरबलाला त्याचे बक्षीस म्हणून काही धनराशी दिली आणि म्हणतात की आता माझी मान तर उंटाप्रमाणे वाकडी होणार नाही न? बिरबल आणि असे म्हणून ते आपले हसू थांबवू शकले नाही. अशा प्रकारे बिरबलाने चातुर्याने न मागता आपले बक्षीस राजा कडून मिळविले.