मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (15:58 IST)

पोपटाचा मृत्यू : अकबर बिरबल कथा

एकदा बादशहा अकबर एका व्यापारी कडून पोपट विकत घेऊन आले. तो पोपट दिसायला देखणा होता आणि फार गोड बोलायचा. अकबरांनी त्याच्या संरक्षणासाठी एक नोकर ठेवला आणि त्याला सक्त ताकीद दिली की जर का हा पोपट मेला तर तुला मी मृत्यू दंड देईन आणि या शिवाय जर कोणी असे सांगितले की हा पोपट मेला आहे तर त्याला देखील मृत्यू दंड दिले जाईल. म्हणून त्या पोपटाला व्यवस्थित ठेवा. 

नोकर त्या पोपटाला घेऊन गेला आणि मोठ्या उत्साहाने त्याचा सांभाळ करू लागला. त्याच्या मनात ही भीती सतत होती की जर हा पोपट मेला तर त्याला बादशहा जीवे निशीच करतील. आणि झाले असेच की एके दिवशी तो पोपट मेला. 

आता त्या नोकराला भीती वाटू लागली त्याला बादशहा ची गोष्ट लक्षात आली. तो धावत धावत बिरबलाकडे गेला आणि त्याला घडलेले सर्व सांगितले. 

बिरबलाने त्याला पाणी पाजले आणि म्हणाले - ' काळजी करू नकोस, मी बादशहाला सांगेन तू सध्या त्या पोपट्या पासून लांब राहा. थोड्या वेळ नंतर बिरबल बादशहाकडे गेले आणि त्यांना म्हणाले की - ' बादशहा आपला जो पोपट होता.. आणि एवढे म्हणून बिरबलाने आपली गोष्ट अर्धवट सोडली. बादशहा - एकाएकी सिंहासनातून उभे राहिले आणि विचारू लागले की काय झाले त्याला ? तो मेला का?

बिरबल म्हणाले की -' मी एवढेच म्हणू इच्छितो की आपला पोपट तोंड देखील उघडत नाही, काही खात नाही, पितं नाही, हालत नाही, फिरत देखील नाही. त्याचे डोळे बंद आहे. आणि तो आपल्या पिंजऱ्यात झोपलेला आहे आपण स्वतः त्याला बघावे'.
 
अकबर आणि बिरबल पोपटाजवळ गेले आणि बघतात तर काय 'ते एकाएकी ओरडले की' अरे हा पोपट तर मेला. बिरबल हे आपण मला त्याच वेळी सांगायला पाहिजे होते.' त्याला सांभाळणारा कुठे आहे ? मी आत्ताचा त्याला मृत्यू दंड देतो'.
 
बिरबल म्हणे 'बादशहा मी त्याला आपल्या समोर हजर करतो पण आपण हे सांगा की मृत्यू दंड देण्यासाठी कोणाला बोलवू? 'म्हणजे काय' अकबर ने विचारले.
 
बादशहा आपणच म्हटले होते की जो कोणी असे म्हणेल की पोपट मेला आहे तर त्याला शिक्षा दिली जाईल, आणि थोड्या वेळा पूर्वीच आपण आपल्या तोंडून हे म्हणाला की पोपट मेला. आता अकबराला आपली चूक कळली.
 
बिरबलाच्या चातुर्याने अकबर हसू लागले आणि ते दोघे हसत हसत दरबारात गेले. अकबराने ताबडतोब घोषणा केली की आता या नोकराविरोधात कोणती ही कारवाई केली जाणार नाही. पोपट स्वतःने मरण पावला आहे, त्या मध्ये कोणाचा ही काहीच दोष नाही.