गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (14:30 IST)

बोध कथा घुबड, साप आणि उंदीर

एका झाडावर दोन घुबड बसलेले होते. एकाच्या पंज्यात साप आणि दुसऱ्या घुबडाच्या पंज्यात उंदीर होता. सापाने उंदराला बघितले तर त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो हे विसरलाच की आपण घुबडाच्या पंज्यात मृत्यूच्या जवळ आहोत. दुसरीकडे सापाला बघून उंदीर घाबरला आणि तोही हे विसरला की आपण देखील घुबडाच्या पंज्यात म्हणजेच मृत्यूच्या जाळ्यात अडकलो आहोत. दोघेही हे विसरले की आपण मृत्यूच्या जाळ्यात अडकलो आहोत. दोघांना आपले प्राण वाचवायचे आहेत पण हे कसं शक्य आहे हे दोघे विसरले. 
 
त्यांना बघून दोघेही घुबड आश्चर्य करू लागले आणि हे बघून काय समजले असे एकाने दुसऱ्याला विचारले दुसरा म्हणाला की याने हे सिद्ध होते की जिभेचे चोचले पुरविण्यासाठी म्हणजे या उंदराला खाण्यासाठी साप तळमळत आहे पण त्याच्या समोर मृत्यू आहे हे देखील हा साप विसरला आहे. आणि हा उंदीर जो देखील मृत्यूच्या जाळात अडकला आहे पण हा साप त्यावर हल्ला करू नये. हे विचार करूनच या सापाला घाबरत आहे. या वरून हे सिद्ध होते की आपण मृत्यूला घाबरत नसतो तरी ही भीतीला घाबरतो आणि इंद्रियांचा लोभ इतका तीव्र असतो की मृत्यू 24 तास आपल्या दारी असते तरी आपण जिभेचे चोचले पुरविण्यात लागलेलो असतो.  
 
तात्पर्य : व्यक्ती मृत्यूने नव्हे तर भीतीमुळे मरतो.