1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 19 जानेवारी 2021 (14:08 IST)

...तर व्हॉट्‌सअॅप वापरू नका, दिल्ली उच्च न्यायालयाचा सल्ला

don't use WhatsApp
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्‌सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत दाखल याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजरची गोपनीयता भंग होते, त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. गोपनीता भंग होत असेल, तर व्हॉट्‌सअॅवप वापरू नका, असा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
 
सुनावणीदरम्यान कोर्टाने फेसबुक आणि व्हॉट्‌सअॅपविरोधात नोटीस जारी करण्यास नकार दिला. या प्रकरणी सविस्तर सुनावणीची आवश्यकता असल्याचे उच्च न्यायालयाने यवेळी स्पष्ट केले. त्यामुळे 25 जानेवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.