1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:34 IST)

शरद पवार म्हणतात, मला देखील मुख्यमंत्री व्हावं वाटतय

Sharad Pawar
शेती कायदा विषयक बनवलेल्या समितीवर शेतकऱ्यांना विश्वास नाही. आम्ही शेतकरी आंदोलनाला  ताकद देणार आहोत. तसेच मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिल्यावर राज्यपाल यांनी कधी फेटाळला नाही, इथं मात्र दुसरंच काहीतरी दिसते, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हाणताना भाजपला राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार चिमटा काढला. तसेच कायदा आणि सुव्यवथा राज्याचा विषय आहे, त्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही इथे केंद्र हस्तक्षेप करत आहे हे आश्चर्यकारक, असे पवार म्हणाले. 
 
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यात काही गैर नाही, मला देखील उद्या मुख्यमंत्री व्हावं वाटते, असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा पाठराखण केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केल आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत जी चर्चा केली होती त्यावेळी आम्हला वाटले होते, यात सत्यता पाहणे गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही जो निष्कर्ष काढला होता तो बरोबर होता. हे आता दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटलंय.